breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवकाने थांबविली चिंचवड रेल्वे स्थानक परिसरातील वृक्षतोड

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड रेल्वे स्टेशन शेजारील पूर्ण वाढ झालेली जुनी झाडे विनापरवाना तोडण्यात येत असल्याची माहिती कळताच भाजपचे नगरसेवक व वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य शीतल शिंदे त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी रेल्वे विभागाच्या कर्मचार्‍यांना रोखत वृक्षतोडीपासून रोखले. त्यामुळे हा प्रकार थांबला. तोपर्यंत सुमारे 15 झाडे रेल्वेच्या कर्मचार्‍यांकडून तोडण्यात आली होती.
चिंचवड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी चिंचवड रेल्वे स्टेशन शेजारच्या रेल्वेच्या हद्दीत वाढलेली झाडे तोडण्याचे काम सोमवारी (दि. 29) अचानक सुरू करण्यात आले. ही बाब नगरसेवक शिंदे यांना समजताच ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना झाडे तोडण्यापासून अटकाव केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परवानगीशिवाय या प्रकारे झाडे तोडता येणार नाही, असे त्यांना ठणकावून सांगितले.
आमच्या हद्दीतील आम्ही झाडे तोडत आहोत, असे उर्मट उत्तर रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले. मात्र, ही झाडे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असून, ती पालिकेच्या परवानगीशिवाय परस्पर तोडता येणार नाहीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी वृक्षतोड थांबविली. तोपर्यंत सुमारे 15 झाडे तोडण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button