breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
नक्षलींच्या हल्ल्यात शहिद झालेल्या १६ शुरवीरांना पिंपरीत भावपुर्ण श्रध्दांजली

– भ्याड हल्ले करणाऱ्या नक्षलींचा जाहिर निषेध
पिंपरी – महाराष्ट्र दिनीच गडचिरोली येथे नक्षलींनी महाराष्ट्र देश सेवेतील जवानांवर भूसुरुंगाच्या माध्यमातून घडवून आणलेल्या प्राणघातक भ्याड हल्यात १६ शहिदांना आपले प्राण गमवावे लागले. त्या 16 शूरवीर जवानांना काळेवाडीतील पाचपीर चाैकात समविचारी संस्था व संघटनाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली. तसेच भ्याड हल्ला करणा-या नक्षलींचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
या घटनेचा महाराष्ट्रासह देशात ठिकठिकाणी त्याचे पडसाद सर्वसामान्य जनतेत उमटले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील पाचपीर चौकात शहारातील सर्वसमावेशक समविचारी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्तपणे दि ३ मे २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता शहिदांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच नक्षलींच्या भ्याड हल्याची निंदा करित तीव्र जाहिर निषेध करण्यात आला.
याबाबतचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी व वाकड वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले. गडचिरोली भ्याड हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अनिता सावळे, अजय हनुमंत लोंढे, संजीवन कांबळे, साकी गायकवाड, सुनिल ढसाळ, भारत मिरपगारे,अभिनव पवार, सुंदर सुर्यवंशी, संगिता शहा, गणेश पवार, सतिश अडागळे आदी उपस्थित होते.