breaking-newsराष्ट्रिय
नक्षलवाद्यांच्या म्होरक्याची मालमत्ता ईडीकडून जप्त

नवी दिल्ली – बिहारमध्ये सक्रिय असणारा माओवादी नक्षलवाद्यांचा म्होरक्या बिनय यादव उर्फ कमलजी याची 77 लाख रूपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत बिहारमधील काही जमीन, 3 बस, आणखी काही वाहने, हेव्ही अर्थ-मुव्हर मशीन आणि बॅंकेतील फिक्स्ड डिपॉझिटचा समावेश आहे. यादवने त्याच्या जावयाच्या कुटूंबीयांच्या बॅंक खात्यांवर 40 लाख रूपये जमा केल्याचे उघड झाले आहे. खंडणीच्या माध्यमातून यादवने मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. नक्षलवादी म्होरक्यांच्या विरोधात ईडीने जप्तीची कारवाई करण्याची ही तिसरी घटना आहे. ईडीबरोबरच सीबीआय, एनआयए, प्राप्तिकर विभागाच्याही रडारवर नक्षलवादी म्होरके आहेत.