ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नक्षलवाद्यांच्या चकमकीत २४ जवान शहीद

सुकमा : छत्तीसगडच्या बस्तरमधल्या सुकमात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २४ जवान शहीद झाले आहेत. सुकमा जिल्ह्यातल्या बुरकापाल-चिंतागुफा भागात ही घटना घडली. रस्त्याच्या कामाला सुरक्षा देण्यासाठी हे जवान तैनात होते.

आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक सीआरपीएफच्या जवानांवर अंधाधुंद फायरिंग सुरू केली. त्यात २४ जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या 74व्या बटालियन रोड ओपनिंगसाठी निघाली होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जवानांवर फायरिंग देखील केली. इतर जवानांनी फायरिंग करत नक्षलवाद्यांना उत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी बराच वेळ चकमक सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button