breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

धनुष्यबाणाला मत देण्याची सूचना, चिंचवडमध्ये मतदान अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार

  • पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्यात चुरशीची लढत

पिंपरी ( महा ई न्यूज ) – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार उभे असलेल्या मावळ मतदारसंघात आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार एका मतदाराने दिली आहे. बळजबरीने शिवसेनेला मतदान करायला सांगितल्याचा आरोप या मतदाराने केला आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्यात चुरशीचे लढत पाहावयास मिळत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवडच्या किन्सटाऊन मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. येथील रहिवासी असलेल्या हुमरा पठाण या जयवंत भोईर प्राथमिक शाळेत मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी, बुथवरील मतदान अधिकारी निकाळजे यांनी शिवसेनेला मतदान करण्याची सूचना हुमरा यांनी केली. शाळेच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 2 मधील बुथ क्रमांक 33 येथे त्यांचे मतदान होते. आपले ओळखपत्र आणि मतदानाची पावती घेऊन मतदान केंद्रावर हुमरा पठाण पोहोचल्या. त्यावेळी, तेथील कर्मचारी निकाळजे यांनी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन त्यांना केले. विशेष म्हणजे निकाळजे यांच्याकडून सर्वच मतदारांना तसे आवाहन करण्यात येत होते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत हुमरा पठाण यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button