breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक! : अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्याची पार्टीमध्ये गोळ्या घालून हत्या

अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी नेत्याची विद्यापाठीच्या वसतीगृहात आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. विशेष म्हणजे दुसऱ्या एका महाविद्यालयातील विद्यार्थी नेत्याने हा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

View image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

Prayagraj: A student leader of Allahabad University was shot dead at a party in varsity hostel yesterday. Brijesh Srivastava, SP City says,”Main accused is a student leader of CMP Degree College. Teams have been deployed to nab him & two accused. Investigation underway.” (1.11)

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठातील वसतीगृहात काही विद्यार्थ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, काही कारणास्तव अलाहाबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि सीएमपी डिग्री कॉलेजचे विद्यार्थी यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद काही वेळातच आणखी पेटला. दरम्यान, सीएमपी कॉलेजच्या विद्यार्थी नेत्याने थेट पिस्तूलच बाहेर काढले आणि ते अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेत्यावर रोखले. काहीवेळात त्याने गोळीबारही केला. या गोळीबारात अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी नेता ठार झाला. प्रयागराजचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.

मात्र, या विद्यार्थ्यांमध्ये कशामुळे वाद निर्माण झाला. तो इतका टोकाला का गेला? तसेच गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याकडे पिस्तूल कसे आले? या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे. सीएमपी कॉलेजचा विद्यार्थी नेता यातील प्रमुख आरोपी असून त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे एसपी श्रीवास्तव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button