breaking-newsराष्ट्रिय

दोन बेपत्ता कॉंग्रेस आमदारांना पोलिस संरक्षणात आणले

  • रेड्डी बंधुंनी घेतले होते ताब्यात

बंगळुरू – कर्नाटकातील सत्ता नाट्यात आज अनेक नाट्यपुर्ण घडामोडी घडल्या. कॉंग्रेसचे सर्व आमदार आज विश्‍वास दर्शक ठरावाच्या मतदानासाठी विधानसभेकडे नेण्यात आले त्यावेळी पक्षाचे दोन आमदार बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कॉंग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली. आनंदसिंग आणि प्रताप गौडापाटील अशी त्यांची नावे आहेत. विधानसभेत सर्व आमदारांचा शपथविधी झाल्यानंतरही त्यांचा शोध लागू शकला नव्हता.

तथापी ते दोन आमदार एका हॉटेलातच बंदिस्त करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्यावर व्हीप बजाऊन त्यांना शपथविधीसाठी विधानसभेत हजर करण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार पोलिस महासंचालक नीलम राजू, आणि बंगळुरूचे पोलिस आयुक्त टी सुनीलकुमार हे आपले पथक घेऊन संबंधीत हॉटेलात धावले. आणि त्यांना शोधून काढले. त्यावेळी वादग्रस्त रेड्डुी बंधुंपैकी जी सोमशेखेर रेड्डी हे या दोन आमदारांबरोबर हॉटेलच्या रूम मध्ये बसल्याचे आढळून आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या आमदारांना संरक्षण देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत असे पोलिसांनी सोमशेखर रेड्डी यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्यांना जाऊ दिले. यावेळी लोकसभेचे सदस्य डी. के. सुरेशकुमार आणि देवेगौडांचे पुत्र रेवण्णा हेही तिथे पोहचले. आम्ही येथे आमचे कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहोत असे त्यांनी सोमशेखर रेड्डी यांना सांगितल्या नंतर त्यांनीही फार हुज्जत घातली नाही. अखेर या नाट्यानंतर हे दोन्ही बेपत्ता आमदार शपथ घेण्यासाठी पोलिस बंदोबस्तात विधानसभेत परतले. त्यामुळे कॉंग्रेस-जेडीएसचा बहुमताचा दावा आणखी प्रबळ झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button