breaking-newsताज्या घडामोडीपुणे

देहूरोड येथील “एनडीआरएफ’ परिसरात वृक्षारोपण

  • रोटरी निगडी, इनरवीलचा उपक्रम

पिंपरी- देहूरोड येथील नॅशनल डिजास्टर रिसोर्स फोर्सच्या (एनडीआरएफ) परिसरात आज (गुरुवारी) रोटरी क्‍लब ऑफ निगडी व इनरवील ऑफ निगडी यांनी 500 झाडांचे वृक्षारोपण केले.
यावेळी 5 एनडीआरएफचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव, कमांडंट संतोष ढाका, ओर्लीकोनचे मुख्य व्यवस्थापक प्रवीण शिर्से, रोटरी क्‍लब ऑफ निगडीचे अध्यक्ष रोटेरियन हेमंत कुलकर्णी, किरण राखे, अजित कोठारी, वैभव गोडसे, इनरवील ऑफ निगडीच्या अध्यक्ष सविता राजापूरकर, फर्स्ट लेडी मुग्धा कुलकर्णी, डॉ. रंजना कदम, जया श्रीवास्तव, अरुण श्रीवास्तव, सुहास ढमाले, सोनाली येवले, माजी अध्यक्ष रानू सिंघानिया, गुरुदीप भोगल, रश्‍मी दोशी, केशव मानगे, सुजाता ढमाले, साधना काळभोर तसेच एनडीआरएफ, रोटरी क्‍लब ऑफ निगडी व इनरवील ऑफ निगडी यांचे सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कमांडंट अनुपम श्रीवास्तव म्हणाले की, या आधीही 1 हजार झाडे लावण्यात आली होती. तसेच आज 500 झाडे लावली आहेत. या सर्व झाडांची जोपासना एनडीआरएफतर्फे करण्यात येणार आहे. कारण पृथ्वीवर झाडे आहेत तोपर्यंत पृथ्वीवर जीवसृष्टी राहणार आहे. त्यामुळे सर्वांनीच असा विचार करायला हवा की आपल्या आयुष्यात कीती झाडे लावली किती जगवली याचा विचार करायला हवा. शाळेतही मुलांना वृक्षारोपणाचे धडे द्यायला हवेत. रोटरी क्‍लब ऑफ निगडी व इनरवील ऑफ निगडी यांचा स्तुत्य उपक्रम आहे. त्यानुसार एनडीआरएफचे जवानही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करतील व या कार्यक्रमाला रोटरी क्‍लब ऑफ निगडी व इनरवील ऑफ निगडी यांनाही आवर्जून बोलवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button