breaking-newsराष्ट्रिय
देशात आज १२३ ठिकाणी फेरमतदान
नवी दिल्ली : मतदानयंत्रांतील बिघाडामुळे सोमवारच्या पोटनिवडणुकीत झालेल्या गोंधळावर फेरमतदानाचा उतारा निश्चित करण्यात आला असून, महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियातील ४९, उत्तर प्रदेशातील कैरनामधील ७३ व नागालँडमधील एक अशा एकूण १२३ मतदानकेंद्रावर आज (बुधवारी) फेरमतदान घेण्यात येणार आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोमवारी मतदानादरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन तासांचा अवधी लागल्याने कंटाळून अनेक मतदार मतदान न करता परत गेले. व्हीव्हीपॅटमध्ये वापरण्यात येणाऱ्या थर्मोसेन्सिटिव्ह पेपरला उन्हाचा तडाखा बसल्याने अडथळे आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील ४९ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.