देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे – कुमार केतकर

पिंपरी – गेल्या सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसने भरपूर काही केलं असुन मोदींनी ज्या विमानातून एअर स्ट्राईक केला ती विमानं काँग्रेसच्या काळातच खरेदी करण्यात आली होती. सध्या देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे चालू आहे जर देशांमध्ये लोकशाही अस्तित्वात ठेवायची असेल तर काँग्रेसला मतदान करावे लागेल, असे मत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उद्योजक रमेश अंबरखाने अध्यक्षस्थानी होते. माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर आदी उपस्थित होते.
केतकर म्हणाले की, सध्या भाजपाकडून दोन मुद्द्यावर निवडणूक लढवली जात आहे. एक म्हणजे राम मंदिर आणि दुसरं म्हणजे मुस्लिम विरोध केला जात आहे. देशात 18 ते 35 या वयोगटातील युवक यांच्या मतावर डोळा ठेवून भाजपाच्या वतीने व्युवरचना केली जात आहे. या देशाचे सार्वभौमत्व व सर्वधर्म समभाव अबाधित ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे.
नरेंद्र मोदी यांचे आणि धर्मही देशाच्या अखंडतेच्या विरोधात आहे. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी कर्मचारी या सर्वांच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दिलेली मोठी आश्वासने पाळली गेली नाही त्यामुळे शेती व्यवस्था व इतर बाबतीमध्ये विकासाला ब्रेक लागला आहे. यासाठी आता काँग्रेसची सत्ता केंद्रामध्ये येणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले.