पुणे
दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ; विक्री दर मात्र कायम

कात्रज – पाणी व चाराटंचाई, तसेच पशुखाद्याचे वाढलेले भाव आणि कमी झालेली दूध उत्पादकता या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. विक्री दर मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
संचालक मंडळाच्या रविवारी झालेल्या सभेत अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी या दरवाढीची घोषणा केली. साडेतीन फॅट व साडेआठ एसएनएफ असलेल्या गाईच्या दूध दरात 27 रुपये 50 पैसे, तर म्हशीच्या दुधाला सहा फॅट व नऊ एसएनएफसाठी 36 रूपये 70 पैसे दर जाहीर करण्यात आला.
सध्याचा उन्हाचा वाढता तडाखा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. या अवस्थेत दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी खरेदी दरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे.