breaking-newsक्रिडा

दुसऱ्या दिवसावर महाराष्ट्र संघाचे वर्चस्व

1 सुवर्ण, 3 रजत आणि 2 कास्य पदकांसह 6 पदकांची कमाई 
जायंट स्टारकेन एमबीटी राष्ट्रीय साकलिंग स्पर्धा 

पुणे – 15 व्या जायंट स्टारकेन एमटीबी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्‍यपद स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या संघाने गाजवला. महाराष्ट्र संघाने दुसऱ्या दिवशी 1 सुवर्ण, 3 रजत आणि 2 कास्य पदकांसह 6 पदकांची कमाई केली. कर्नाटक संघानेही दुसऱ्या दिवशी 5 पदकांची कमाई करत आपली घौडदौड कायम ठेवली.

पुण्यातील सनीस वर्ल्ड येथे चालू असलेल्या या स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या मानसी कमलाकरला मुलींच्या सब जुनियर (15-16 वर्षे) गटात सुवर्णपदक मिळवले. मानसीने 14.7 किमीचे अंतर 48 मिनिटे 21.797 सेकंदात पार पाडले. याच प्रकारात महाराष्ट्राचीच सिद्धी शिर्के रजत पदकाची मानकरी ठरली. तिने हे अंतर 51 मिनिटे 37.728 सेकंदात पूर्ण केले.

महिलांच्या एलिट गटात (19 वर्षांवरील) सशस्त्र सेना बलाच्या पूनम राणाने 1 तास 6 मिनिटे आणि 10.101 सेकंदात 14.7 किमीचे अंतर पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. या प्रकारात महाराष्ट्राच्या प्रणिता सोमणने कास्यपदकाची कमाई केली. तिने हे अंतर 1 तास 11 मिनिटे 13.580 सेकंदात पूर्ण केले. मुलांच्या युथ (14 वर्षांखालील) गटात कर्नाटकच्या चारिथ गौडा ने सुवर्ण पदक मिळवले. त्याने 14.9 किमीचे अंतर 51 मिनिटे 34.076 सेकंदात पूर्ण केले.

याच गटात महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलने कास्य पदक मिळवले. अथर्व ला हे अंतर पूर्ण करण्यास 55 मिनिटे 13.477 सेकंद्‌स लागले. मुलांच्या सब-जुनियर गटात ( 15-16 वर्षे) कर्नाटकच्या अडोनीस टांगपू ने सुवर्ण पदक मिळवले. 14.9 किमीचे अंतर पूर्ण करण्यास त्याला 48 मिनिटे 6.252 सेकंद लागले. या गटात महाराष्ट्राच्या भूषण चव्हाण ला कास्य पदक मिळाले. भूषण ने हे अंतर 55 मिनिटे आणि 5 सेकंदात पूर्ण केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button