दुसऱ्या टप्प्यात 25% उमेदवार कोट्यधीश, 38 उमेदवारांविरोधात गुन्हेगारी प्रकरणे दाखल

मुंबई- महाराष्ट्रात १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, परभणी, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, अमरावती व सोलापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असून एकूण १७९ उमेदवार मैदानात आहेत. एका उमेदवाराचे शपथपत्र उपलब्ध नसल्याने १७८ उमेदवारांपैकी ४५ उमेदवार (२५%) हे कोट्यधीश आहेत. यापैकी नांदेड येथील अपक्ष उमेदवार मनीष वडजे यांची संपत्ती ६५ कोटींपेक्षा जास्त असून संपत्तीच्या बाबतीत ते क्रमांक एकवर आहेत. त्यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे ५० कोटींपेक्षा जास्त संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) संस्थेच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मालमत्ता : टॉप टेन उमेदवार
क्र उमेदवाराचे नाव पक्ष मालमत्ता
1. मनीष वडजे, नांदेड अपक्ष 65+कोटी
2. अशोक चव्हाण, नांदेड काँग्रेस 50+कोटी
3. राणा जगजितसिंह, उ.बाद राष्ट्रवादी 41+कोटी
4. सुशीलकुमार शिंदे, सोलापूर काँग्रेस 38+कोटी
5. गुणवंत देवपारे, अमरावती वंचित 35+कोटी
6. अरुण वानखेडे, अमरावती बसप 33+कोटी
7. सुधाकर शृंगारे,लातूर भाजप 28+कोटी
8. प्रीतम मुंडे,बीड भाजप 16+कोटी
9. बजरंग सोनवणे,बीड राष्ट्रवादी 16+कोटी
10. वैजनाथ फड,परभणी बसप 12+कोटी
२३ उमेदवारांवर गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल. वंचितचे २, बसपचे २, शिवसेनेचा १, काँग्रेसचे २ व राष्ट्रवादीच्या २ उमेदवारांचा समावेश. भाजपच्या एकाही उमेदवारावर कसलेही गुन्हेगारी प्रकरण दाखल नाही.
यांच्यावर सर्वाधिक देणी-कर्ज
राणा जगजितसिंह पाटील १० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणींसह पहिल्या क्रमांकावर आहेत. सुधाकर श्रृंगारेंवर १० कोटी रुपयांची देणी आहेत. प्रीतम मुंडे यांच्यावर ९ कोटी, अशोक चव्हाण यांच्यावर ४ कोटी देणी असून संजय धोत्रे यांच्यावर १ कोटीची देणी आहेत. सर्वाधिक श्रीमंत मनीष वडजेंवर २ कोटीची देणी आहेत.
39+ लाख रु. सर्व उमेदवारांची सरासरी देणी किंवा कर्ज
113 उमेदवारांनी विवरणपत्र जाहीर केले नाही
15 उमेदवारांनी पॅन घोषित केलेले नाही