breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दिवसाला चार बळी ; तरीही रस्ता सुरक्षेबाबत आमदारांना गांभीर्य नाही

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष खासदार आढळराव यांची टीका

पुणे : पुणे जिल्ह्यमधील रस्ते अपघातात दिवसाला चार जणांना प्राण गमवावे लागतात. ही स्थिती बदलण्याची गैरज आहे. मात्र, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या मागील आठवडय़ात झालेल्या बैठकीला जिल्ह्यतील एकही आमदार उपस्थित नव्हता. यावरून एकाही आमदाराला रस्ता सुरक्षेबाबत गांभीर्य नसल्याचेच दिसून येत आहे, अशी टीका जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सोमवारी केली.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिसांची वाहतूक शाखा, महामार्ग पोलीस आणि फग्र्युसन महाविद्यलयाच्या वतीने २९ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. त्या वेळी आढळराव बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, पुणे महानगैर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अधीक्षक सारंग आवाड, महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, आनंद पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

आढळराव म्हणाले, की भारतामध्ये रस्ते अपघाताची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यचा विचार केल्यास वर्षांला सुमारे १४०० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. म्हणजेच दिवसाला ही संख्या चारवर जाते. त्यामुळे याबाबत काही उपाययोजना करून परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेसंबंधी गेल्या सहा महिन्यांत नियमाप्रमाणे दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.

शहर आणि जिल्ह्यत विधानसभा आणि विधानपरिषदेचे एकूण २८ आमदार आहेत. त्यापैकी एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हता. ही परिस्थिती दुर्दैवी आहे. यंदाच्या सुरक्षा सप्ताहात हॉर्न न वाजविण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्याबाबत प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी राऊत म्हणाले, की आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य वाहन चालविताना हॉर्नचा वापर करणे शंभर टक्के टाळतात.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button