breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांची मराठी साहित्य संमेलनासंदर्भात वादग्रस्त पोस्ट, म्हणे…

मुंबई – दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर नवीन वाद निर्माण केला आहे. यावेळेस त्यांनी अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनासंदर्भात वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन कुंडलकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे.

”मराठी साहित्य  संमेलनासारख्या 2000 वर्षे आऊटडेटेड आणि खर्चिक टाईमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली की केस काळे करावेत, दारू सोडावी, व्यायाम सुरू करावा, दर सहा महिन्याने तपासण्या करून घ्याव्यात . आपले वय वाढले असल्याचे भयंकर लक्षण. what the *** फिलिंग.  कारण अशा ठिकाणी आपल्यापेक्षा १९० वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पाहायची सवय होती”, अशी फेसबुक पोस्ट त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीवरुन अपलोड केली आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button