Mahaenews

दापोडीत एसटी कार्यशाळेतील कामगारांचे आंदोलन

Share On

पिंपरी – दापोडी येथील विविध मागण्या व अन्यायकारक आदेशांचा निषेधार्थ एसटी कामगारांनी आंदोलन केलेदापोडी कार्यशाळेतील कामगारांनी प्रवेशद्वारावर जमून जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाचे आदेश अन्यायकारक असून, ते मान्य नाहीत असे सांगून त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या, बस बांधणीचे तास कमी करणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, साहित्यपुरवठा वेळेवर न करणे, कार्यशाळेतील अस्वच्छता आदी बाबींकडे लक्ष वेधले. यावेळी कामगार संघटनेचे विभागीय सचिव व्यंकट सुपलकर, अध्यक्ष राहुल धिवार, सचिव अनिल उलपे, कार्याध्यक्ष शांताराम शिंदे, चंद्रकांत चव्हाण आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

Exit mobile version