दाताच्या शस्त्रक्रियेत रुग्णांचा अतिरक्तस्त्राव होवून मृत्यू, स्टर्लिंग रुग्णालयातील घटना

पिंपरी – निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली. दाताची शस्त्रक्रिया करण्यास दाखल झालेल्या रुग्णाचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे.
धनश्री जाधव असे 23 वर्षीय मुलीचे नाव असून, याप्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाची तक्रारी अर्ज दाखल केला.
दीड वर्षांपासून धनश्रीच्या दातांचे दुखणे सुरु झाले. त्यानंतर निगडीच्या स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात धनश्रीवर उपचार सुरु होते. धनश्री ही आठ दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली. उपचार सुरुही झाले. परंतु ज्यावेळी उपचार सुरू होते. त्यावेळेस धनश्रीचा अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली. याच घटनेकडे नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केले. त्यात धनश्रीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेनंतर स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टर हे फरार झाले आहेत. या प्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज केला असून निगडी पोलीस तपास करत आहेत.