breaking-newsआंतरराष्टीय

दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचा गोळीबार, चकमक सुरु

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील चानकीत्तार गावात सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. शोध मोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकावर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवर हल्ले सुरुच आहेत. मागच्या आठवडयात जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे जमावाने केलेल्या दगडपेकीत एक जवान शहीद झाला. राजेंद्र सिंह (वय २२) असे त्या जवानाचे नाव असून तो लष्करात शिपाई पदावर कार्यरत होता.

ANI

@ANI

Encounter breaks out between security forces and terrorists in Chaanketaar village of Pulwama’s Tral. J&K Police said terrorists fired on searching party during a cordon & search operation in the area.

अनंतनाग येथे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या ताफ्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पथकात राजेंद्र सिंह याचा समावेश होता. गुरुवारी हा ताफा अनंतनागमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ येथून जात असताना काही तरुणांनी ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत राजेंद्र सिंह हा जवान जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, शुक्रवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र सिंह हा मूळचा उत्तराखंडचा असून तो लष्करात शिपाई होता. बोदना गावातील रहिवासी असलेला राजेंद्र सिंह हा २०१६ मध्ये लष्करात भरती झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button