breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दगाबाज प्रियकर गजाआड

पिंपरी – वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी यांचे 2014 पासून चिंचवडला एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांचे घट्ट मैत्री जमली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि लग्नाचे आमिष दाखवून २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलिसांकडे आरोपी सूरज नढे (वय २५) याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वाकडमध्ये राहणारा सूरज नढे आणि पीडित मुलगी २०१४ पासून चिंचवमध्ये एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांची मैत्री जमली आणि त्याचेच रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. प्रेम रुपी रोपटं फुलवण्याचे स्वप्न तरुणी पाहत होती. परंतू सूरज धोका देईल, असे तिला स्वप्नातही वाटले नसेल. सूरजने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिला स्वतःच्या घरात, हॉटेलमध्ये नेले. तिच्याशी शरीरसंबंधही ठेवले.

मार्च २०१८ मध्ये पीडित तरुणी ही ७ आठवड्याची गरोदर असल्याचं समोर आलं. हा प्रकार आरोपी सूरज नढेला सांगण्यात आला. पण त्याने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला. पीडित तरुणीने आरोपीचे घर गाठले. सूरजच्या कुटुंबीयांनी देखील तिला स्वीकारण्यास नकार दिला. याऊलट त्यांनी तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला. अखेर २४ वर्षीय पीडित तरुणीने थेट वाकड पोलिस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार दिली. सूरज विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आढाव या करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button