Mahaenews

दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या विभक्त पत्नी विनी मंडेला यांचे निधन

Share On

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या विभक्त पत्नी विनी मंडेला यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. विनी यांच्या खासगी सचिवाने त्यांच्या निधनाचे वृत्त ‘बीबीसी’ या ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिले. विनी यांचा १९५८ मध्ये नेल्सन मंडेलांशी विवाह झाला. मात्र, बहुतांश काळ नेल्सन मंडेला तुरुंगात होते. याच काळात विनी स्वत:ही वर्णद्वेषाविरोधात लढा देत होत्या. या काळात त्यांना तुरुंगवास तसेच, काही काळ नजरकैदेतही घालवावा लागला. तुरुंगातून हातात हात घालून बाहेर पडतानाचा या दोघांचा फोटो त्या काळी गाजला होता. सुमारे तीन दशके हे दाम्पत्य वर्णद्वेषविरोधी लढ्याचे प्रतीक बनून राहिले. मात्र, अखेरच्या काळात विनी यांच्यावर काही आरोपही झाले होते.

१९९६मध्ये विनी यांनी नेल्सन मंडेलांपासून घटस्फोट घेतला. मात्र, घटस्फोटानंतरही त्यांनी मंडेला आडनाव वापरणे, तसेच नेल्सन मंडेलांबरोबरचा स्नेह कायम ठेवला होता.

Exit mobile version