breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावात सात महागड्या वाहनांची तोडफोड, नागरिकांचे आर्थिक नुकसान

पिंपरी – थेरगाव परिसरात समाजकंटकांनी आणखी 7 वाहनांची तोडफोड केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 23) रात्री अकराच्या सुमारास थेरगाव परिसरात घडला.

महेश मुरलीधर तारू (वय 43, रा. नम्रता हौसिंग सोसायटी, नखाते नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार करण शिंदे, चिक्या सूर्यवंशी, नवनाथ भातकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून (एम एच 14 / ए एफ 4601) तीन ते चार तरुण आरडाओरड करत आले. तिघेजण नम्रता हौसिंग सोसायटीमध्ये आले असता महेश यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून महेश यांना कोयत्याचा धाक दाखवून खिशातून एक हजार रुपये हिसकावून नेले. तिघांनी मिळून नम्रता हौसिंग सोसायटी आणि शिक्षक कॉलनी मधील 7 दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button