breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

थेरगावमध्ये उभारणार शंकर गावडे स्मृती कामगार भवन

पिंपरी- महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येणा-या कै. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनचे भूमिपूजन रविवार (दि. 13 मे) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

थेरगाव येथे दिलीप वेंगसरकर क्रिकेट अॅकेडमीजवळ प्रभाग क्रमांक 23 येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे असणार आहेत. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, सुप्रिया सुळे, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत.

कामगारवर्गाच्या विविध कार्यक्रमासाठी हे कामगार भवन एकूण दीड एकर जागेत उभारण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रुपये खर्च झाले. अल्पदरात हे कामगार भवन उपलब्ध करण्यात येणार असून पार्किंगची सोय असणार आहे. यावेळी संचालिका सीमा सुकाळे, मुख्य प्रवक्ते मनोज माछरे, महासंघाच्या महासचिव चारुशीला जोशी, कार्याध्यक्ष हनुमंत लांडगे, सचिव अनिल लखन, मुख्य संघटक महाद्रंग वाघेरे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button