Mahaenews

त्या कर्मचा-यांचे महापालिकेत हेलपाटे

Share On

 

पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि, (पीएमपीएमएल) चे 178 कर्मचा-यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग करण्यात यावे, याकरिता  हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या कर्मचा-यांनी लोकप्रतिनिधीचे उंबरवटे झिजवून हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे सत्ताधा-यांनी पीएमपीएमलच्या बैठकीत त्या कर्मचा-यांना पालिकेत रुजू करुन घेण्याच्या सूचना केल्या. त्यामूळे महापालिकेत रुजू करुन घेण्यासाठी शनिवारी काही कर्मचा-यांनी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेतली आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी कर्मचा-यांची नितांत कमतरता असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत कार्यरत असलेल्या पीएमपीच्या 178 कर्मचा-यांना पुन्हा पीएमपी सेवेत वर्ग करुन घेण्यासाठी पत्र दिले. त्यानूसार तत्कालीन पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्या कर्मचा-यांना तात्काळ कार्यमुक्त केले होते. त्यानंतर कर्मचारी पीएमपीएमएलमध्ये रुजू झाले. त्यांना विविध ठिकाणी बदली केल्याने कामासाठी अडचणी व गैरसोय होवू लागली. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर अनेकांचा रोष होता. त्यांची नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नयना गुंडे संचालक म्हणून आल्या आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलमध्ये रुजू झालेल्या या 178 कर्मचा-यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत वर्ग करुन घेण्यासाठी आमदार, महापौर, नगरसेवकांकडे हेलपाटे मारले जात आहेत. त्या कर्मचा-यांना महापालिका प्रशासनात समावून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Exit mobile version