breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तृणमूल कॉंग्रेसला शह देण्यासाठी सीपीआय (एम) भाजपाची हातमिळवणी

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) – परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा आणि सीपीआय (एम) यांनी प्राथमिक पातळीवर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. समान शत्रू तृणमूल कॉंग्रेसला पंचायत निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी ही हातमिळवणी केल्याची माहिती देण्यात आली आहे, नाडिया जिल्ह्याचे सीपीआय (एम)प्रमुख सुमेत डे यांनी ही महिती देताना म्हटले आहे.

त्रुणमूल कॉंग्रेसचा एकास एक मुकाबला करण्यासाठी जागावाटपाबाबत ही हातमिळवणी करत असल्याचे आणि याचा पक्षाच्या धोरणाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही एक अपवादात्मक घटना असल्याए भाजपाच्या उत्तर नाडिया जिल्हा अध्यक्षानी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात करीमनगरमध्ये दोन्ही पक्षांनी तृणमूल कॉंग्रेसच्या हिंसाचाराच्या विरोधात एकात्र रॅलीचे आयोजन केले त्यावेळी या हातमिळ्वणीची बातमी जगजाहीर झाली. सीपीएम (एम) चे ज्येष्ठ नेते आणि संसद सदस्य रामा विश्‍वास या प्रसंगी हजर होते.

पश्‍चिम बंगालमधील 3368 ग्राम पंचायतींच्या 48,650 जागांपैकी 16,819 जागांसाठी बिनविरोध निवडी झाल्या आहेत. 341 पंचायत समित्यांच्या 9217 जागांपैकी 3019 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, आणि 20 जिल्हा परिषदांसाठीच्या 823 जागांपैकी 203 बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button