‘तुला पाहते रे’, ‘भाभी जी घर पर है’सह इतर मालिकांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशात मालिकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांचे प्रचारतंत्र सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. यावरून भारतीय निवडणूक आयोगाने कडक पावले उचलली असून मालिकांच्या निर्मार्त्यांना नोटीस दिली आहे.
‘मालिकांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार करण्याबाबत येत्या २४ तासात स्पष्टीकरण द्यावे’ असे निर्देश निवडणूक आयोगाने मालिकांच्या निर्मात्यांना दिले आहेत. मराठीमध्ये ‘तुला पाहते रे’ तर हिंदीतील ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ या मालिकांमधून मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार करण्यात आला आहे. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता.
ह्यभाभीजी घर पर हैह्ण आणि ह्यतुझसे हे राबताह्ण या मालिकांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनांचे प्रचार केला जात असल्याचे निदर्शनास आले. ह्यतुझसे हैं राबताह्ण या मालिकेतील एका दृश्यामध्ये दोन पात्र संवाद साधत असताना भाजपच्या मुद्रा लोन योजनांची माहिती देण्यात आली आजे. तसेच ह्यनामुमकिन है अब मुमकिनह्ण असे वाक्य एका पात्राच्या तोंडी आहे. ह्यभाभीजी घर पर हैह्ण मालिकेतील एका सीनमध्ये स्वच्छ भारत अभियानाची माहिती देत मोदींनी ९ कोटी शौचालय बांधल्याची चर्चा करत असतानाचे दाखवण्यात आले आहे.