breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

तुमच्या सगळ्या समस्या सोडवेन, पण तुमची साथ मला हवीय – पार्थ पवारांची आर्त हाक

  • पंचशीलनगरात पार्थ पवारांनी जाणून घेतल्या रहिवाशांच्या समस्या
  • पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महिलांनी दिल्या घोषणा

पनवेल , ( महा ई न्यूज ) – नवीन पनवेल येथील पंचशीलनगरात राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी स्थानिक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी सुमारे पाचशेहून अधिक रहिवाशी उपस्थित होते.

यावेळी पार्थ पवार यांनी तेथील सर्व महिला, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. स्थानिकांनी मूलभूत समस्येबरोबर घरांचा प्रश्न गंभीर असून आम्हाला घरे मिळावेत, अशी मागणी पार्थ पवारांकडे मांडली. यावर पार्थ पवारांनी मी तुमच्या सगळ्या समस्या निश्चित सोडवेन, तुमची मला  साथ द्या, अशी विनंती त्यांना केली.

याप्रसंगी पार्थ पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा महिलांनी दिला. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी अध्यक्षा आर.सी.घरत, इंटकचे अध्यक्ष महेंद्र घरत, सुनिल घरत, माजी नगरसेवक शिवदास कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button