Uncategorized

तुकाराम मुंढे यांचा झंझावात… अधिकार्‍यांच्या कामात अदलाबदल!

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर  तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाला मार्गावर आणण्यासाठी एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा धडाका कायम ठेवला आहे. कर्मचार्‍यांचा ओव्हरटाईम बंद केल्यानंतर त्यांनी आता अधिकार्‍यांकडे मोर्चा वळवला आहे.   कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी अधिकार्‍यांची अदलाबदल करताना पीएमपीची प्रशासकीय जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे यांच्याकडे सोपवली आहे. सरव्यवस्थापक अनंत वाघमारे यांच्याकडे जलद बस वाहतूक (बीआरटी) विभाग दिला आहे. कामकाजात सुसूत्रता आणणे आणि कर्मचार्‍यांसह विविध विभागांच्या अधिकार्‍यांचे प्रश्‍न, त्यांना शिस्त लावण्याचे आव्हान या अधिकार्‍यांसमोर असणार आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कामामध्ये बदल करून पीएमपीच्या एकूणच कामकाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मुंढे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पीएमपीचे सहव्यवस्थापक डी. पी. मोरे यांच्याकडे असलेले प्रशासन विभाग, विधी विभाग, स्वच्छता विभाग, स्थापत्य विभाग सुषमा कोल्हे यांच्याकडे वर्ग केल्याचे मुंढे यांनी आदेशात म्हटले आहे.  या चारही विभागातील अधिकारी -कर्मचार्‍यांनी कोल्हे यांच्या नियंत्रणाखाली आणि सूचनेनुसार काम करावे, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच, कोल्हे यांच्याकडे पूर्वी असलेले महत्त्वाचे आर्थिक अधिकारही तसेच ठेवून त्यांना प्रशासन विभागातील दैनंदिन कामकाज आणि आर्थिक अधिकार दिले आहेत. कोल्हे या सहव्यवस्थापकांच्या नियंत्रणाखाली काम पाहणार आहेत. पीएमपीचा जनसंपर्क विभाग सहव्यवस्थापक डी.पी. मोरे यांच्याकडेच ठेवला आहे. पीएमपीचे सरव्यवस्थापक अनंत वाघमारे यांच्याकडे वाहतूक व्यवस्थापक, बसेस संचलन, आगारातील अभियंता विभाग, जलद बस वाहतूक (बीआरटी) विभाग, माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कैलास गावडे हे बीआरटीचे प्रमुख म्हणून कार्यरत असणार असून, शिरीष कालेकर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांची जबाबदारी राहणार आहे.

मुख्य अभियंता सुनील बुरसे यांचा आगारातील अभियंता विभाग वाघमारे यांच्याकडे वर्ग केला आहे. भांडार विभाग प्रमुख चंद्रशेखर कदम निलंबित झाल्याने मुख्य हिशेब तपासणीस पंकज गिरी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button