breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…ती घटना अत्यंत दुर्दैवी; मात्र चौकशीनंतर दोषींवर कारवाई होईल – आमदार लक्ष्मण जगताप

 

पिंपरी – संत तुकारामनगर येथील टपरीधारकाच्या आत्महत्तेची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये भाजपच्या नगरसेविकेचे नाव आले असले, तरी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. 29)  सांगितले.

 

सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. 28) गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता सुनील पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद होते. त्यानुसार भाजपच्या नगरसेविका पालांडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप म्हणाले की, “टप-या बनविणे हा सचिनचा व्यवसाय होता. एका टपरीचे 25 हजार रुपये घेतले जात होते. परंतु, त्याला 25 हजार रुपये मिळत नव्हते. ही घटना अतिशय दुर्देवी आहे. याची खंत वाटते. मुळात असा व्यवसाय करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आपेक्षित असते. परंतु, आपल्याकडे परवानगी न घेता व्यवसाय केले जातात. यामध्ये कोणाची चूक आहे. महापालिकेचे अधिकारी काय करत होते, याची सविस्तर चौकशी केली जाईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button