breaking-newsराष्ट्रिय

तीन दिवसात इंडियन एअर फोर्सचे दुसरे फायटर विमान कोसळले

नवी दिल्ली : इंडियन एअर फोर्सच्या ‘जॅग्वार’ फायटर विमानाला शुक्रवारी गुजरातमध्ये भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथील एअर फोर्सच्या तळाजवळ जॅग्वार विमान कोसळले. तीन दिवसात एअर फोर्सचे दुसरे जॅग्वार विमान कोसळले असून एअर फोर्ससाठी हा एक झटका आहे. सुदैवाने या दुर्घटनेतून वैमानिक बचावला.

नियमित उड्डाणाचा सराव करुन जॅग्वार विमान जामनगर एअर बेसवर परतत असताना विमानात तांत्रिक बिघाड उत्पन्न झाला व हे विमान कोसळले. वैमानिक वेळीच बाहेर पडल्याने या अपघातातून बचावले.

या अपघातात वैमानिक जखमी झाले कि, नाही ते समजू शकलेले नाही. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी गुजरातच्या कच्छमध्ये एअर फोर्सचे जॅग्वार विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या घटनेत पायलट संजय चौहान हे शहीद झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button