breaking-newsराष्ट्रिय
तामीळनाडूच्या बॅंकेतून कोट्यवधींचे हिरे लुटले

चेन्नई – तामीळनाडूतील एका सार्वजनिक बॅंकेच्या शाखेतून कोट्यवधी रूपयांचे हिरे लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, नेमक्या किती रकमेचे हिरे लुटण्यात आले याबाबतचा तपशील मिळू शकलेला नाही. हिरे लुटण्याची घटना तामीळनाडूच्या तिरूवल्लूर जिल्ह्यात घडली. आठवडा अखेरमुळे बंद असलेली संबंधित बॅंकेची शाखा आज उघडण्यात आली. त्यानंतर हिरे लुटीचा प्रकार बॅंक कर्मचाऱ्यांच्या ध्यानात आला.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लुटारूंना शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, लुटण्यात आलेले हिरे ग्राहकांच्या सेफ डिपॉझिट लॉकर्समध्ये ठेवण्यात आले होते. लुटीच्या घटनेनंतर बॅंकेकडून नेमकी माहिती देण्यात आली नसल्याने हिरे डिपॉझिट करणारे ग्राहक हवालदिल झाल्याचे वृत्त आहे.