…तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागेल- अजित पवार

मुंबई : जर शिवसेनेने साथ सोडली तर आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांना झाली आहे. त्यामुळेच भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरुवात केली आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवसेनेने सरकाराचा पाठिंबा काढल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका होतील. त्याचा निकाल काय लागेल, याचा साधकबाधक विचार शिवसेनेने केलाच असेल. मात्र, दुसरीकडे भाजपाची धोरणे ठरवणाऱ्या नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करायला सुरूवात केली आहे. चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी आणि स्वत: पक्षाध्यक्ष अमित शहा हे जाहीरपणे शिवसेनेशी युती करावीच लागेल, असे जाहीरपणे सांगतात. यावरून एक स्पष्ट होते की, शिवसेनेची साथ सोडल्यास आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागेल, याची स्षष्ट जाणीव या नेत्यांना झाली आहे.