breaking-newsआंतरराष्टीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्यात आल्याने ते पुन्हा प्रसिद्धिच्या झोतात आहेत. या पुतळ्याला लिलावात 28 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 18 लाख 66 हजार रुपये मिळाले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 2016मध्ये पार पडली. या निवडणुकीच्या वेळी एका कलाकाराने डोनाल्ड ट्रम्प यांचे काही नग्न पुतळे तयार केले होते. हे नग्न पुतळे लॉस एंजलिस, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क, सिएटल आणि क्वीवलॅंड या ठिकाणी लावण्यात आले होते. राष्ट्राध्यपदी निवड झाल्यानंतर हे पुतळे हटविण्यात आले. मात्र, त्यापैकी एक अखेरचा पुतळा तसाच होता. या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यावेळी लिलावात या पुतळ्याला 28 हजार डॉलर अर्थात भारतीय रुपयांप्रमाणे 18 लाख 66 हजार रुपये इतकी किंमत मिळाली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा नग्न पुतळा लॉस एंजलिस येथील 4600 ब्लॉक या ठिकाणी असलेल्या हॉलिवूड बुलेवार्ड या ठिकाणी कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या न्यूड पुतळ्यांच्या श्रृंखलेपैकी हा शेवटचा पुतळा आहे. जिंजर या कलाकाराने हा पुतळा तयार केला असून या पुतळ्यासाठी माती आणि सिलिकॉन वापरण्यात आले आहे. या पुतळ्याचे वजन 80 पाऊंड आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button