breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

डॉक्टर, नर्स,आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुगलने डूडलद्वारे मानले आभार

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये आपल्या जीवाची परवा न करता दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे गुगलने डूडलद्वारे आभार मानले आहे. या डूडलवर क्लिक केले असता कोरोनाशी संबंधित सरकारी वेबसाईटची माहितीही येते.

याआधी देखील गुगलने २ एप्रिलला डूडल तयार केले होते. या डूडलद्वारे गुगलने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले होते. गुगलने तयार केलेल्या डूडलचे प्रत्येक अक्षर घरामध्येच राहून कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कामात व्यग्र असल्याचा संदेश देत होते. तर या डूडलवर क्लिक केले असता कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती येत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button