breaking-newsआंतरराष्टीय
डेन्मार्कमध्ये बुरखा, निकाबवर बंदी

डेन्मार्क : डेन्मार्कमध्ये बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. असा कायदा करण्याची आवश्यकता नव्हती असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
डेन्मार्कच्या संसदेत बुरखा आणि निकाब बंदीचे विधेयक ७५ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्याचा आपला हेतू नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डोक्याला बांधायचा स्कार्फ, पगडी आणि पारंपारिक ज्यू टोपीवर बंदी घालण्यात आलेली नाही. येत्या १ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या कायद्याची कशी अंमलबजावणी करायची ते पोलिसांवर अवलंबून आहे असा डेन्मार्कचे न्यायमंत्री सोरेन पोयुलसेन यांनी सांगितले.