breaking-newsताज्या घडामोडीपुणे

डाॅ. अनिल राॅय यांना सक्तीच्या रजेवर पाठवा – विलास मडेगिरी

पिंपरी- महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी सूचना स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी अतिरिक्त आयुक्त डॅा. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे केली आहे.  महापालिकेच्या  आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य विलास मडेगिरी यांनी म्हणाले की, डाॅ. राॅय यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात फसवणूक, सायबर क्राईम, अॅट्रोसिटी कायद्यासह विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी यापुर्वी महापालिका प्रशासन व नगरसेवकांविरोधात गंभीर आरोप करणारे पत्रक काढले होते. तसेच त्यांनी प्रशासनाविरोधात पीएमआे कार्यालय, आपले सरकार वेबपोर्टलवर देखील तक्रार केली होती. त्यावर त्यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस काढून जाब विचारला होता. त्यांच्याकडे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा रितसर पदभार नसताना देखील त्यांनी पदभार काढून घेवू नये, म्हणून न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यांनी महापालिका प्रशासन, नगरसेवकांची  फसवणूक केली आहे. खोट्या तक्रारी देखील त्यांनी दाखल केल्या  आहेत. त्यामुळे डाॅक्टर अनिल राॅय यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशा सूचना मडेगिरी यांनी स्थायीच्या बैठकीत केली.  दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॅा अनिल राॅय यांच्याबाबत कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button