डान्सिंग अंकलना बॉलिवूडकडून ऑफर्स

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर डान्सिंग अंगलच्या व्हिडीओ क्लीप खूप व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये एक महाशय गोविंदाच्या स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. एका इव्हेंटमध्ये गोविंदाच्याच “आप के आजाने से’ या गाण्यावर ते थिरकतानाहा व्हिडीओ शूट झाला होता. हे महाशय म्हणजे मध्यप्रदेशातील ईलेक्ट्रॉनिक्सचे प्राध्यापक संजीव श्रीवास्तव आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून त्यांच्या मोबाईलवर कॉल आणि मेसेज यायला लागले ते अजूनही थांबलेले नाहीत. त्यंच्या डान्स स्टेप्स बघून त्यांना काही इव्हेंटसाठीही बोलावले जायला लागले आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या डान्सिंग अंकलना विदीशा महानगरपालिकेचे ऍम्बेसेडर नियुक्त केले आहे. डान्सिंग अंकलच्या या व्हिडीओला एवढ्या प्रचंड प्रमाणात लाईक मिळायला लागले की स्वतः गोविंदाही या अंकलवर बेहद खूष झाला आहे. त्याने आपल्या पत्नीलाही हा व्हिडीओ दाखवला. त्याच्या शिवाय अनुष्का शेट्टी, अर्जुन कपूर, सुनिल शेट्टी या सर्वांनी डान्सिंग अंकलच्या डान्सस्कीलचे कौतुक केल्याचे समजते आहे.
आता या डान्सिंग अंकलना बॉलिवूडमधून ऑफरही येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडमध्ये सुनिल शेट्टी त्यांना मदत करणार असल्याचेही समजते आहे. म्हणून ते मुंबईत आले आहेत.