breaking-newsआंतरराष्टीय
टोरांटोत सार्वजनिक ठिकाणी गोळीबार ; 2 ठार

टोरांटो – कॅनडातील टोरांटो या शहरात काल रात्री सार्वजनिक ठिकाणी एका इसमाने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली तर अन्य 14 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तेथे पोलिसांवरही गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर हल्लेखोराने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली त्यामुळे या गोळीबाराच्या घटनेत एकूण दोन जण ठार झाले आहेत.
हल्लेखोराने लोकांवर गोळ्या झाडायला सुरूवात केल्यानंतर सुरक्षा बंदोबस्तावर असलेल्या पेलिसांनीही त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. कॅनडात गोळीबाराच्या अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत त्यामुळे नागरीकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यंदा कॅनडात अशा प्रकारच्या एकूण दोनशे घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.