टीव्ही अभिनेत्यावर महिला ज्योतिषाचा बलात्काराचा आरोप, एफआयआर दाखल

मुंबईत एका महिला ज्योतिषाने एका टीव्ही अभिनेत्यावर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्थानकात आरोपी अभिनेत्याविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं आणि पैसे उकळले असं पीडित महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुन चौकशी सुरू केली आहे. मुंबई मिररने याबाबतचं वृत्त आहे.
ओशिवारा पोलीस स्थानकातील एफआयआरनुसार, ऑक्टोबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅप्लिकेशनद्वारे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. पीडितेने सांगितल्यानुसार, एक दिवस आरोपीने भेटण्यासाठी त्याच्या फ्लॅटमध्ये बोलावलं. येथे आरोपीने लग्नाचं वचनही दिलं. यादरम्यान आरोपीने नारळ पाणी दिलं होतं, ते पाणी प्यायल्यानंतर थोड्याच वेळात तिला चक्कर आली. त्यानंतर आरोपीने बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओही बनवला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्या व्हिडीओद्वारे आरोपी सातत्याने ब्लॅकमेल करत होता आणि पैसे उकळत होता आणि लग्नाबाबत विचारणा केल्यास केवळ टाळाटाळ करत होता. काही दिवसांपूर्वी मी लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने धमकी देऊन जे करायचं अ