breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टीपी स्कीममधून म्हाळुंगे आदर्श गाव असेल

  • पालकमंत्री बापट : पीएमआरडीए हद्दीत विविध कामे सुरू

पुणे – म्हाळुंगे गावातील पिण्याचे पाणी, घन कचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते बांधणी आणि गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करुन, म्हाळुंगे परिसर आदर्श वसाहत म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हाळुंगे गाव हे टीपी स्कीमच्या माध्यमातून साकारणारे आदर्श गाव असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

पीएमआरडीए हद्दीतील म्हाळुंगे ग्राम पंचायत सक्षमीकरण योजनेंतर्गत घन कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी वितरण कार्यक्रम पार पडला, त्यावेळी पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सरपंच मयूर भांडे, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बापट म्हणाले, म्हाळुंगे गावाच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. त्याचबरोबर हिंजवडी आयटी पार्क जवळच आहे. यामुळे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी इमारती बांधण्यात येत आहेत. याठिकाणी होणाऱ्या बांधकामावरील शुल्कातून म्हाळुंगे गावाची विविध कामे हाती घ्यावी व यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी सूचना यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे. या विकासकामासाठी अभ्यासपूर्ण नियोजन महत्त्वाचे आहे. कचरा विल्हेवाट करणे हा एक महत्त्वाचा प्रश्‍न शहरासमोर आहे. त्याचबरोबर वाहतूककोंडी व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

गित्ते म्हणाले की, म्हाळुंगे गावातील कचरा वर्गीकरणासाठी ओला व सुका कचरा याचे नियोजन करून कायमस्वरुपी या घंटागाडी ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनी टीपी स्कीमसाठी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. हिंजवडीचा विकास पाहता भविष्यात म्हाळुंगे गावाचा विकास होणे महत्त्वाचे आहे. भविष्यात याच गावात घनकचरा प्रक्रिया राबवून वेगळा प्रकल्प तयार केला जाणार आहे

म्हाळुंगे-नांदे-चांदे रस्ता कामाचे भूमीपूजन
पीएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत असलेल्या म्हाळुंगे-नांदे-चांदे या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. याच भागात हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री यांनी केली. रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांनी अडचणी समजावून घेतल्या.

हिंजवडीच्या विकासासाठी महत्त्वाची बैठक
हिंजवडी आय.टी.पार्क परिसरात विविध आय.टी.कंपन्या कार्यरत आहेत. येथील उद्योजकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी आय.टी. इंडस्ट्रिज असोसिएशन आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, एमआयडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्‍त श्रावण हर्डिकर तसेच उद्योजक उपस्थित होते. या बैठकीत आयटी पार्क परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, पोलीस स्टेशन उभारणी, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा, परिसरात काम करणाऱ्यांसाठी चांगल्या दर्जाची वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजविणे इत्यादी कामे त्वरित करण्याबाबत पालकमंत्री बापट यांनी आदेश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button