breaking-newsमनोरंजन

टीका करणाऱ्यांना नियाने दिलं ‘हे’ सडेतोड उत्तर

छोट्या पडद्यावरील कमी कालावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री निया शर्मा आपल्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळे सतत चर्चेत असते. निया अनेक वेळा आपले फोटो इन्टाग्रामवर पोस्ट करत असल्याचे दिसून येते. एवढेच नाही तर आशिया खंडातील सेक्सी महिलांमध्येही तिची गणना केली जाते. ‘एक हजारो में मेरी बहेना है’ या लोकप्रिय हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या निया काही दिवसांपूर्वी ट्रोलची शिकार झाली होती. मात्र नियाने या ट्रोलर्सला चांगलंच सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या नियाने काही दिवसापूर्वी पांढऱ्या रंगाचा जाळीदार ड्रेस घातला होता. या ट्रेसमधील फोटो नियाने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्यावर अनेक ट्रोलर्सने टिका केली असून चांगले कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. मात्र ट्रोलर्सचे हे सल्ले आणि टीका ऐकून नियाने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

‘लोकांना काय आवडेल हा विचार करुन मी कधी माझ्या कपड्यांची निवड करत नाही. त्यामुळे जर टीका करणाऱ्यांना माझे कपडे आवडत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, माझा नाही. यापूर्वीदेखील मला रेड कार्पेट लूकवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र माझ्याकडे या टीकांकडे लक्ष देण्याएवढा वेळ नाही. माझ्याकडे आणखी बरीच काम आहेत जिथे मी लक्ष देऊ शकेन. मी कायमच माझ्या स्टाईल स्टेटमेंटकडे लक्ष देत असते आणि मला नवनवीन प्रयोग करुन पाहणे देखील आवडत. त्यामुळे कोण माझ्यावर काय टीका करतय यावरुन मला जराही फरक पडत नाही’, असं सडेतोड उत्तर नियाने दिलं.

दरम्यान, ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देणारी निया कायमच वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत येत असते. काही दिवसापूर्वी मुंबईतील ट्रॅफीकला कंटाळून नियाने चक्क गाडीतून बाहेर येत भररस्त्यात डान्स केला होता. तिच्या या डान्सचा व्हिडिओही कमालीचा व्हायरल झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button