पिंपरी / चिंचवड

टिव्हीएस लॉजिस्टिक कामगारांच्या लढ्याला यश; वेतनात 30 टक्के वाढ

कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या प्रयत्नांना यश
 पिंपरी : टिव्हीएस लॉजिस्टिक मधील माथाडी कामगारांच्या वेतनवाढ व इतर सेवा शर्थी बाबतच्या लढ्याला अखेर यश आले आहे. कामगारांच्या वेतनात 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कामगार नेते इरफान सय्यद आणि त्यांच्या संघटनेने यासाठी वारंवार पाठपुरावा करून वेतनवाढ करुन दिल्यामुळे टिव्हीएस लॉजिस्टिकच्या कामगारांनी इरफान सय्यद यांचे आभार मानत पेढ़े वाटून आनंदोत्सव साज़रा केला.
 नव्याने झालेल्या करारावर कामगार प्रतिनिधी म्हणून सुनील सावळे, संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, कार्याध्यक्ष परेश मोरे आणि जेष्ठ कामगार नेते बाळासाहेब शिंदे यांनी तर कंपनी व्यवस्थापनाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्नकुमार व मनुष्यबळ विभागाचे शिरीष मखाले यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी महाराष्ट्र मज़दूर संघटनेचे खंडूमामा गवळी, पांडूरंग क़दम, सर्जेराव कचरे, भिवाजी वाटेकर यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.
 टिव्हीएस लॉजिस्टिक मधील कामगारांचा वेतन करार मार्च 2016 रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पदाधिका-यांनी कामगारांचे मागणीपत्र सादर केले. यासंदर्भात माथाडी बोर्डातील संघटनेचे पदाधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बैठका होऊन देखील कंपनी वेतनवाढीसाठी चालढकल करत होते. अखेर महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे  कंपनी प्रशासनाने कामगारांच्या मुळ वेतनात 30 टक्के वाढ केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button