breaking-newsराष्ट्रिय

झारखंड मध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार व जीवंत जाळले

रांची – झारखंड राज्यात एका सोळा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून जीवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सोळा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील चार जण अद्याप बेपत्ता आहेत.

सदर मुलीच्या घरच्या लोकांनी सांगितले की घरातील सारे जण एक लग्न समारंभासाठी गेले असता दारू प्यायलेल्या चार जणांनी आपल्या घरात घुसुन मुलीला पळवून नेले आणि अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आपण गावच्या सरपंचांकडे तक्रार केली असता त्यांनी आरोपींना शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आणि 50 हजार रूपयांचा दंड भरण्याची सूचना करून त्यांना सोडून दिले असे मुलीच्या पालकांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात सरपंचांकडे तक्रार केल्याने संतापलेल्या आरोपींनी अन्य साथीदारांना बरोबर घेऊन आमच्या घरावर हल्ला केला आमचे घर जाळून टाकले आणि आम्हाला मारहाण केली असेही त्यांची तक्रार आहे. या प्रकरणाची पोलिसांनी आता दखल घेतली असून 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यातील सोळा जणांना अटक केली आहे. राज्य सरकारने पीडित परिवाराला अडीच लाख रूपयांची मदत घोषित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button