ज्वालामुखीच्या उद्रेकाने मध्य अमेरिका हादरली; २५ बळी

वॉशिंग्टन : मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला या देशामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ नागरिकांचा बळी गेला आहे. तर ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक जण बेपत्ता असून त्यांच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान ज्वालामुखीच्या आसपासच्या प्रदेशातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
ग्वाटेमालाची राजधानी असलेल्या ग्वाटेमाला सिटीपासून पश्चिमेकडे काही अंतरावर असलेल्या ‘फ्युगो’ या ज्वालामुखीचा भीषण स्फोट झाला. याबरोबर ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात राख आणि लावा बाहेर येऊ लागला. यामुळे ज्वालामुखीमधील तप्त राख कित्येक फुट उंचावर उडाली, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये दूरपर्यंत पसरली. याचवेळी ज्वालामुखीच्या पायथ्याजवळ पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावरही राख पडल्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर लावा चहुबाजूला पसरल्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला होता. यामध्ये काही वाहने देखील लावामध्ये जळाल्याच्या घटना घडल्या.