क्रिडामहाराष्ट्र

जेष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे निधन

नाशिक : राज्याचे माजी पोलिस महासंचालक व जेष्ठ क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी दुपारी महात्मानगर येथे व्याख्यान देत असताना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. उद्या, शनिवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
पोलिस महासंचालकपदी असताना त्यांना मानाचे राष्ट्रपती पदक देखील मिळाले होते. आपली कार्य क्षमता सिध्द करण्य़ासाठी योगाचा कसा वापर केला जाऊ शकतो याचे अनेक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी धडे दिले होते. त्यांनी क्रीडा मानसोपचार या विषयात प्राविण्य मिळवले होते. ते नियमीतपणे विविध खेळाच्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करीत असत. मानसिक तणाव, सांघीक व्यवस्थापन, यांच्या मार्गदर्शनावर त्यांचे प्रभुत्व होते इंडीयन ऑलिम्पिक टीमचे ते मार्गदर्शक होते. त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या योग विद्या गुरुकुल येथे येणाऱ्या साधकांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. अॅप्लाइड मॅथेमॅटीक्स अॅन्ड स्टॅटीस्टीक हा त्यांचा विषय होता. ते १९६३ साली डेप्युटी सुप्रिटेंन्डेट ऑफ पोलिस या पदावर ते राज्याच्या पोलिस दलात दाखल झाले १८ वर्ष त्यांनी प्रत्यक्ष पोलिस दलात काम केले त्यानंतर ग्रह़मंत्रालयात त्यांनी डेप्युटेशनवर बदली झाली. पोलिस दला तर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्ष संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्याच बरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमानपत्रात सातत्याने ते लिखाण करीत होते. त्यांनी क्रीडा मनसोपचार या विषयावर अनेक पुस्तके लिहीली मना सज्जना आणि मार्ग यशाचा , विजयाचे मानसशासत्र ही सर्वात जास्त खपलेली पुस्तके होय. त्यांचे Winning habit हे पुस्तक हिंदी मराठी, तामिळ, पंजाबी भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. सध्या ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे प्रेसिडेन्ट म्हणून कार्यरत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button