जी-7 परिषदेत डोनॉल्ड ट्रम्प पडले एकाकी-परिषदेवर टाकला बहिष्कार

मालबेई (कॅनडा) -कॅनडातील मालबेई येथे चालू असलेल्या जी-7 परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प एकाकी पडल्याचे दिसून आले आहे. जागातिक व्यापार नियमांचे उल्लंघन् केल्याबाबत अमेरिका आणि पाश्चिमत्य देश यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. जागातिक व्यापार नियमनांचे उल्लंघन आणि अन्य अनेक मुद्यांबाबत एकाकी पडलेल्या ट्रम्प यांनी परिषदेवर बहिष्कार टाकल आणि ते अमेरिकेला निघून गेले.जागतिक व्यापार विषयक नियम, पर्यावरण, इराण आणि रशियाला जी-7 मध्ये पुन्हा सभासदत्व देणे अशा अनेक मुद्यांवर अगदी पहिल्या बैठकीतच अमेरिका आणि जी-7 राष्ट्रे यांच्यात गंभीर मतभेद निर्माण झाले होते.
कॅनडाचे पंतप्रधान जस्ट्नि ट्रुडो यांनी युरोपियन आणि जपानी नेत्यांबरोबर अमेरिकेने लोह आणि अल्युमिनियमवर लावलेल्या अवैध आयात शुल्काबाबत चर्चा केली. परिषदेत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांनीही आपली बाजू दमदारपणे मांडली. व्यापार आणि विकास यांचे अतूट संबंध आहेत. आणि व्यापार ही गोष्ट साधीसोपी नाही, त्यांमुळे सहमती असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
रशियाला जी-7 मध्ये सहभागी करून घेण्याबाबत डोनॉल्ड ट्रम्प यांनी प्रस्ताव मांडला. जी-8 अधिक प्रभावी शाबित होईल असे त्यांनी प्रतिपादन केले, पण त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नाही अमेरिकेचे जवळचे सहयोगी कॅनडा आणि ब्रिटनही या प्रस्तावापासून दूरच राहिले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाला जी-7 चा सभासद होण्याचे इच्छा नाही असे सांगून ट्रम्प यांच्या प्रस्तावावर पाणी फेरले. जी-7 परिषद अर्धवट सोडून अमेरिकेत परतलेल्या ट्रम्प यांनी ट्विटद्वारे कॅनडाच्या पंतप्रधानांवर आगपाखड केली आहे. ट्रुडो यांनी ट्रम्प प्रस्तावित नाफ्टा (नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ऑर्गनायझेशन) करारावर सही करण्यासही नकार दिला. नाफ्टा करारावर सही केल्यास लोह आणि अल्युमिनियमवरी आयात कर 25 टक्के करण्याचेही ट्रम्प यांनी सांगितले होते. संतप्त ट्रम्प यांनी ट्रुडो यांना बेईमान आणि कमजोर अशीही विशेषणे लावली. अमेरिकेस प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन आयातीवर कॅनडा वाढीव आयात शुल्क लागू करील असेही ट्रुडॉ यांनी म्हटले आहे.