breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

जिल्हा रुग्णालयात मोफत केमोथेरपी सुविधा

मुंबई – राज्यातील जिल्हा रुग्णालयात लवकरच केमोथोरेपीची सुविधा मोफत सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.  येत्या जून  महिन्यापासून या योजनेचा पहिला टप्पा सुरुवात होणार आहे. याकरिता जिल्हा रुग्णालयातील फिजीशिअन व नर्स यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कॅन्सरग्रस्त रूग्णांवर कऱण्यात येणाऱ्या केमोथेरीपीची सुविधा नागपूर, गडचिरोली, पुणे, अमरावती, जळगाव, नाशिक, वर्धा, सातारा, भंडारा आणि अकोला या १० जिल्ह्यांत करण्यात येत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत म्हणाले की, “आता जिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामूळे गोरगरीब आणि गरजूंना मुंबईत येण्याची गरज भासणार नाही. शिवाय त्यांच्या राहण्याचा आणि प्रवासाचा खर्चही वाचणार आहे. जूनपासून हे युनिट जिल्हा रुग्णालयात सुरू होवून उर्वरित  जिल्हा रुग्णालयांमध्ये दुसऱ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.”

दरम्यान, या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. केमोथेरपी औषध देण्याचं प्रशिक्षण प्रत्येक जिल्हा रुग्णालयातील एक फिजीशिअन आणि स्टाफ नर्स यांना देण्यात येणार आहे. यासाठी टाटा रुग्णालयाच्या मदतीने मेडीकल ऑन्कोलॉजी विभागात तीन आठवड्यांचं प्रशिक्षण मे महिन्यापासून दिले जाणार आहे. राज्यात कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. या आजाराच्या जनजागृतीसाठी अनेक मोहीम हाती घेतल्या जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button