breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणणार धमाकेदार ऑफर!

मुंबई : रिलायंस जिओच्या धन धना धन ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलने नवा प्लान लॉन्च केला आहे. एअरटेलने 399 रुपयेमध्ये 70 दिवसासाठी अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये रोज 1GB 4G डेटा दिला जाणार आहे. जिओची देखील अशीच ऑफऱ आहे ज्यामध्ये 399 रुपयामध्ये 70GB डेटा मिळणार आहे.

ट्विटर यूजर संजय बाफना यांनी एक ट्विट केलं ज्यामध्ये ही ऑफर फक्त ४ जी स्मार्टफोन आणि 4G सिम यूजर्सला मिळणार आहे. या सोबतच कंपनी जिओला टक्कर देण्यासाठी आणखी काही प्रीपेड प्लान देखील लॉन्च करु शकते. यामध्ये दोन पॅक असू शकतात. ज्यामध्ये एका दिवसाला 1 ते 2 जीबी डेटा दिला जाऊ शकतो.

कंपनीने अजून याची अधिकृत घोषणा केलेली नाही. या प्लानची वॅलिडिटी 90 दिवसांची असेल. 244 रुपयांच्या प्लानचा देखील उल्लेख यामध्ये आहे ज्यामध्ये अनलिमिटेड डेटा आणि एअरटेल टू एअरटेल अनलिमिटेड कॉलिंग दिली जाऊ शकते. याची वॅलिडिटी 70 दिवस असू शकते.

जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल 509 रुपये आणि 648 रुपयांचा प्लान देखील आणणार आहे. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत प्रत्येक दिवशी 2GB डेटा मिळेल. हा प्लान एअरटेल प्रीपेड कस्टमर्ससाठी असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button