जाहिरातीसाठी लावलेल्या ‘बीव्हीजी’ इंडियाच्या 160 ‘एलईडी टीव्ही’ चोरीला

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जाहिरात करण्यासाठी लावलेल्या बीव्हीजी कंपनीच्या तब्बल 160 कमर्शिअल ‘एलईडी टीव्ही’ चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
हर्षद राजकुमार पाटील (वय ३५, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पराग विश्वासराव मोरे, प्रशांत नारायण सद्रीक, शोयब बशीद सैय्यद आणि राघव सदाशिव कदम या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी बीव्हीजी इंडिया कंपनीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कमर्शिअल एलईडी टीव्ही लावल्या आहेत. त्यातील 160 एलईडी टीव्ही चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. तब्बल 35 लाख 28 हजार रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत आरोपींनी टिव्ही काढून त्याची विक्री केली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.