breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ – छगन भुजबळ

मुंबई –  शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असं म्हणत छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसंच, माझ्या पडत्या काळात शिवसेना दोन शब्द चांगले  बोलली,याचं समाधान आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे काँग्रेस ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. गुरूवारी (ता. 10 मे) सकाळी केईएम हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर छगन भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतान त्यांनी हे वक्तव्य केलं आेहे. जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांचा सर्वात पहिला फोन आल्याचं ते म्हणाले. आराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्याचं भुजबळांनी नमूद केलं.

तुरुंगातील अनुभव कसा होता असे विचारल्यानंतर भुजबळ मिश्किलपणे हसत म्हणाले की, ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ असे उत्तर दिले.  महाराष्ट्र सदनबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले की, ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपात मला तुरुंगवास झाला, आज त्याच महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, देशात या सदनाचा लौकिक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button