Mahaenews

जस्टीन बीबरच्या शोसाठी सेलिब्रिटींची गर्दी, आयोजकांवर तूफान तोंडसुख

Share On

मुंबई : प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टीन बिबरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत पर्पज शो नवी मुंबईत पार पडला. त्याच्या या शोसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून त्याचे फॅन्स, नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये हजारो रुपयांची तिकीटं खरेदी करून दाखल झाले होते. पण महागडी तिकीटं काढून जस्टीनची एक झलक बघायाला मिळेल या आशेनं डीवाय पाटील स्टेडियममध्ये आलेल्या अनेकांनी सोशल मीडियात आयोजकांवर तूफान तोंडसुख घेतलं.

स्टेडियमधील व्यवस्थापन तर ढिसाळ होतंच. शिवाय शो संपल्यावर ट्रॅफिकच्या समस्येनं लोकांना घरी पोहचणं अवघड होऊन बसलं. त्यामुळे अनेकांनी शोच्या आयोजनावर टीकेची झो़ड उठवली आहे. जस्टीनच्या शो साठी मोठ्या संख्येनं सेलिब्रिटी उपस्थित राहाणार हे माहित असूनही सुरक्षा व्यवस्थेची योग्य ती खबरदारी घेण्यात आली नव्हती असंही अनेकांनी ट्विटरवर म्हटलंय.

बॉलिवूडलाही जस्टीननं भूरळ घातलेली पाहायला मिळाली. अनेक बॉ़लिवूड कलाकारांनी जस्टीनच्या शोला आवर्जून हजेरी लावली. यामध्ये आलिया भट, श्रीदेवी, बोनी कपूर, अर्जून रामपाल, अरबाज खान, मलाईका अरोरा खान, निशा पटनी, संगितकार अनू मलिक, संजिदा शेख आणि इतरही सेलेब्रिटींचा समावेश होता. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे त्यांच्या मैत्रिणीसोबत कार्यक्रमाला हजर होते.

Exit mobile version